नाशिक मध्ये रंग बरसे; नाशिककरांनी लुटला आनंद.....

 होळी पाठोपाठ येणाऱ्या रंग उत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले होते. नाशिक मधील राहण्याची दातदुजी व रंगारंगोटी करण्यात आल्यानंतर नाशिककरांनी रंगपंचमीचा पुरेपूर आनंद घेतला. 

पेशवेकालीन रहाडी मध्ये डुबण्याचा आनंद घेऊन नाशिककरांनी रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी केली. शहरातील दिल्ली दरवाजा, पंचवटी शनी चौक, मेन रोड मधली होळी दंडे हनुमान चौक तसेच जुने नाशिक मध्ये नाशिककरांनी रहडी मध्ये डुबण्याचा आनंद घेत डीजेच्या तालावर तिरकस जल्लोषात रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली.

हे ही वाचा : अंबड एमआयडीसी मध्ये औद्योगिक वसाहतीत लूटमार करणाऱ्यांना पोलिसांच्या बेड्या.....

धार्मिक आणि सांस्कृतिक वारसांचे जतन करण्यासाठी नाशिक शहराची ओळख आहे. दरवर्षी नाशिकमध्ये विशेष अशी रंगपंचमी साजरी केली जाते. राहडी मध्ये डुबकी मारून नाशिकमध्ये आपली आगळीवेगळी रंगपंचमी साजरी केली जाते. 

जुन्या नाशिक मधील राहणींसह शोवर्ड डान्स आणि एकमेकांवर रंगांची बरसात करीत रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी करण्यात रंगपंचमीला कुठल्याही गालबोट लागू नये, म्हणून जुने नाशिक परिसरासह शहरातील प्रत्येक भागात महिला पथकांसह आयुक्तालयाच्या गुन्हे शोध पथकांना पाचरण करण्यात आले होते. 

हे ही वाचा : जॉगिंग ट्रॅक की वाहनतळ? १० वर्षापासून समस्या कायम.......

दंगल नियंत्रण पथक राखीव पोलीस दल जलद प्रतिसाद पथकाची अतिरिक्त कोमक रंग उत्सवावर नजर ठेवून होती. यावेळी एखाद्याने रंगाचा बेरंग केल्यास हे गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला होता. 

दरम्यान नाशिक मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील रंगाची उधळण करीत जल्लोषात पारंपारिक रंग उत्सव साजरा करण्यात आला. तरुणाईने पारंपारिक होळी खेळत रहाड मध्ये डान्स करत  शॉवर डान्स करत आनंद लुटला. 

Previous Post Next Post